Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधमहान गणिततज्ज्ञ लीलावती

महान गणिततज्ज्ञ लीलावती

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

प्राचीन काळात भारतीय स्रिया अनेक क्षेत्रांत कार्यरत होत्या. अनेक विषयात आवडीने सहभागी होत होत्या. विविध विषयांतील सभांमध्ये होणार्‍या वादविवादात सहभागी होत होत्या. यामध्ये एक मोठे नाव आहे गणित विषयातील आचार्यां लीलावती यांचे. महान गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांची लीलावती ही एकुलती एक कन्या होती.

- Advertisement -

आज जगामधील अनेक देशांमध्ये ज्या गणिताचा आधार घेऊन गणित शिकवले जाते त्या गणिताचा पाया भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी रचला. त्यांनी गणित विषयावरील ‘सिद्धांत शिरोमणी’ या मौलिक ग्रंथांची रचना केली. त्यातील एका शोध ग्रंथाला त्यांनी आपल्या कन्येच्या नावावरून ‘लीलावती’हे नाव दिले. लीलावती स्वतः महान गणिततज्ज्ञ होत्या हे लक्षात घेतले पाहिजे. लीलावती झाडाच्या पानांची संख्या लीलया मोजून अल्पावधीत सांगत असे.

भारतामध्ये गणित विषयांमध्ये सखोल अभ्यास झाला आहे. त्यामध्ये ज्या गणितीय सिद्धांताचा शोध केला गेला आजही त्या सिद्धांताचा अभ्यास करताना आधुनिक गणित तज्ज्ञांची बुद्धी चक्रावून जाते अशा गणिती सिद्धांताच्या निर्मितीत वडील भास्कराचार्यांबरोबर लीलावतींचे कार्य होते हे विशेष. लीलावती यांनी अध्यापक म्हणूनही तिने कार्य केले.

अगदी कमी वयामध्ये वैधव्य आले. या दुःखाने लीलावती आणि भास्कराचार्य दोघे खूप खचून गेले. लीलावती आपल्या वडिलांच्या छत्र छायेखाली राहायला आली. आपल्या मुलीचे दुःख दूर व्हावे, तिने कशात तरी स्वतःला गुंतवून घ्यावे यासाठी वडिलांनी तिला गणित शिकवण्यास प्रारंभ केला. वडिलांनी शिकवलेले ज्ञान लीलावती अल्पावधीत आत्मसात करत. गणिताचे अध्ययन हेच आपल्या जीवनाचे तिने ध्येय मानले. अल्पावधीतच लीलावतीने गणितात पांडित्य प्राप्त केले. तिला गणित शिकणे सोपे व्हावे यासाठी भास्कराचार्यांनी गणितातील सूत्रे काव्यात रचली. ज्यामुळे तिला सुत्रे पाठ करण्यास खूप सोपे वाटेल, त्यानंतर त्या सूत्रांचा उपयोग करून गणितातील इतर प्रश्नांची उत्तरे काढली जात असत. हे सूत्र पाठ करणे सहज सोपे व्हावे यासाठी ते तिला सोप्या सरळ भाषेत अगदी प्रेमाने समजावून सांगत असत. मुलीला शिकवण्यासाठी गणितासारख्या अवघड विषयाच्या सूत्रांची रचना भास्कराचार्यांनी पद्यरूपात केली. त्यांनी गणितातील महान ग्रंथाची निर्मिती केली आणि त्या ग्रंथाला नाव दिले ‘लीलावती’. या ग्रंथाद्वारे त्यांनी आपल्या कन्येचे नाव अजरामर केले. गणित हा अतिशय कठीण, निरस विषय वाटतो. परंतु या ‘लीलावती’ ग्रंथाद्वारे गणित कशाप्रकारे मनोरंजनातून, जिज्ञासा उत्पन्न करत आनंदाने शिकवता येतो हे दाखवून दिले आहे. त्यातील एक उदाहरण आहे, सुंदर अशा फुलांच्या समूहातील तृतीयांश, पंचमांश तथा षष्ठमांश फुले असे क्रमशः शिव, विष्णू आणि सूर्य यांच्या पूजेला वापरली. चतुर्थांश भाग फुले पार्वतीला अर्पण करून उरलेल्या सहा फुलांनी गुरुचरणाची पूजा केली तर हे प्रिय बाले लीलावती लवकर सांग बरं,त्या फुलाच्या समूहात एकूण किती फुले होती. वडिलांच्या प्रश्नावर लीलावतीने पटकन उत्तर दिले,त्यात त्या फुलांच्या समूहात 120 फुले होती. अशा पद्धतीने लीलावतीने वडिलांकडून सोप्या पद्धतीने लीलया गणित शिकली आणि गणिततज्ज्ञ झाली. या अध्ययनाबरोबर अनेक खगोलीय प्रश्नावर ती वडिलांबरोबर चर्चा करीत असे. न्यूटनने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध लावला. त्याच्या कितीतरी आधी लीलावतीने आपल्या वडिलांना प्रश्न केला, त्यात आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती कशाचा आधार घेऊन आहे. यावर भास्कराचार्यांनी उत्तर दिले,काही लोक सांगतात, पृथ्वीला शेषनागाने डोक्यावर तोलून धरले आहे. तर काही लोक म्हणतात पृथ्वी कासवावर, हत्तीवर विराजमान आहे किंवा अन्य कोणत्या तरी वस्तूने तिला तोलून धरले आहे. ह्या सर्व समजूती चुकीच्या आहेत. जरी आपण हे मानले की पृथ्वी या गोष्टीचा आधार घेऊन आहे तर मग या वस्तू कशाचा आधार घेऊन आहेत, हा प्रश्न तर निर्माण होतोच होतो. अशा प्रकारे कारणासाठी… कारण हा क्रम सुरूच राहतो याला अनवस्था दोष असे म्हणतात.

एवढ्यावर समाधान न होऊन लीलावतीने प्रश्न केला, तरीही त्यात हा प्रश्न तसाच राहिला की, पृथ्वी कशाच्या आधारावर आहे.आपल्या कन्येला पडलेल्या प्रश्नावर भास्कराचार्यांनी सिद्धात स्पष्ट करीत सांगितले, पृथ्वी ही कुठल्याही गोष्टीवर आधारून नाही तर ती आपल्यामध्ये असणार्‍या बलावर टिकून आहे. त्या शक्तीला धोरणात्मक शक्ती असे म्हणता येईल. अर्थात पृथ्वीमध्ये आकर्षण शक्ती आहे. जी इतर पदार्थांना आपल्याकडे खेचून घेते. परंतु आकाशात इतर ग्रहांची चारी बाजूंनी सारखी ताकद लागत असल्यामुळे ते ग्रह विशिष्ट अंतरावर राहतात. अर्थात विविध ग्रहांमधील गुरुत्वशक्ती त्यांच्यामधील संतुलन टिकून ठेवतात.़

हे सर्व ज्ञान श्री भास्कराचार्यांनी ‘लीलावती’ या स्वरचित ग्रंथात संकलित केले आहे. हा महान ग्रंथ वैदिक साहित्य म्हणून प्रसिद्ध आहे. भास्कराचार्य जेवढे उच्च कोटीचे वैज्ञानिक गणित तज्ज्ञ होते, त्याच्याप्रमाणेच लीलावती सुद्धा महान विदुषी होती. तिला ज्ञानी बनविण्याचे, घडविण्याचे कार्य तिच्या वडिलांनी केले.

भास्कराचार्यांनी पाटी गणित, बीजगणित आणि ज्योतिष या विषयावर आधारित ‘सिद्धांत शिरोमणी’ या महान ग्रंथांची रचना केली. त्यातील गणिताच्या अधिकांश भागाची रचना लीलावतीने केली आहे. पाटी गणित या भागाला लीलावती ग्रंथ असे आपल्या कन्येचे नाव देऊन तिला अमर केले. लीलावतीच्या प्रश्नांना उत्तर देण्याच्या कारणामुळेच ‘सिद्धांत शिरोमणी’ या विशाल ग्रंथाची रचना भास्कराचार्यांनी केली. तो ग्रंथ चार भागात आहे,1) लीलावती, 2)बीजगणित, 3) ग्रह गणिताध्याय, 4) गोलाध्याय. लीलावतीत अतिशय सरळ आणि काव्यात्मक भाषेत गणित आणि खगोलशास्त्राचे सूत्र स्पष्ट केले आहे.

अकबराच्या दरबारातील विद्वान फेजी याने 1587 मध्ये लिलावती या ग्रंथाचा फारशी भाषेत अनुवाद केला. जे वेलर्स यांनी 1716 मध्ये लीलावती या ग्रंथाचा इंग्रजी भाषेत प्रथम अनुवाद केला. लीलावतीतील काव्यात्मक गणितावरून अगदी आत्तापर्यंत भारतातील अनेक गणित शिक्षक पाढे, गणिती सूत्रे पद्यरुपाने शिकवतात. त्यामुळे ते शिकणा-याच्या चांगले स्मरणात राहतात.भास्कराचार्य आणि त्यांची कन्या लीलावती दोघे त्यांच्या कार्यामुळे अजरामर झाले. आजही गणिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीस ‘लीलावती’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. महान गणितज्ज्ञ भास्कराचार्य व त्यांची पुत्री लीलावती यांचे कार्य जगाला मार्गदर्शक ठरले. त्यांच्या या म

- Advertisment -

ताज्या बातम्या