Thursday, May 30, 2024
Homeनाशिकआगीत किराणा दुकान जळून खाक

आगीत किराणा दुकान जळून खाक

मटाने | प्रतिनिधी | Matane

कळवण देवळा रोडवरील (Kalwan Devla Road) भऊर फाटा येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत (Fire) किराणा दुकान जळून (Burn) खाक झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; शिंदे गटाने केला करेक्ट कार्यक्रम

याबाबत अधिक माहिती अशी की, भऊर फाटा येथील पंढरीनाथ मंगु आहेर यांच्या मालकीच्या किराणा दुकानास (Grocery store) रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत किराणा माल, फ्रीज, टीव्ही, काऊंटर, रॅक यासह अनेक साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ३ लाखांचे नुकसान (Damage) झाले आहे. यासोबतच भाऊसाहेब वाघ यांच्या सलूनच्या दुकानाचेही ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून विजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तसेच व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंढरीनाथ आहेर यांनी केली आहे.

Nashik : सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघांचे विषप्राशन; एकाचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या