Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो'ला वाढता प्रतिसाद

‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ला वाढता प्रतिसाद

उद्या शेवटचा दिवस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.’ प्रायोजित व सुमित बिल्डकॉन सहप्रयोजित ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची (दि.१५) सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून पंचवटीकरांनी ‘वीकएण्ड’चा पुरेपूर आनंद घेतला.

YouTube video player

‘देशदूत’ आयोजित ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे गृह व व्यावसायिक प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. दुपारी 2 वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. पंचवटी परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष बघता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

काल आलेल्या अनेक ग्राहकांनी आज प्रत्यक्ष साईटवर पाहणी केली. तसेच काही ग्राहक उद्या साईट व्हिजिट करणार आहेत. अनेकजण घर घेण्यास अनुकूल आहेत. उद्या (दि.१६) प्रदर्शनाचा समारोप होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दुपारी 2 ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.

‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिककरांचे ३७ वर्षांपासून असलेले फॅमिली बिल्डर हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सहप्रयोजक सुमित बिल्डकॉन, फायनान्शिअल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र तर, पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी आहेत. आज (दि. १६) दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित पंचवटी प्रोपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सहभागी बांधकाम व्यावसायिक
हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सुमित बिल्डकॉन, सुराणा ग्रुप, महालक्ष्मी इस्टेट, मॅप इन्फ्रा (आनंदग्राम), आशापुरी कन्स्ट्रक्शन, श्याम ग्रुप, सी. डी. आय. एल., एलिका ग्रुप, वेदाज स्पेसेस, ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, इच्छामणी बिल्डकॉन, ट्रीनीती रिअल्टर्स, फोर्थ डायमेंशन डेव्हलपर्स, क्रिश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, समर्थ ग्रुप, रचिता कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि., शेठ रियल्टी, सोमविजय कन्स्ट्रक्शन्स, हरी ओम ग्रुप, न्यू जय अंबे प्रॉपर्टीज, स्वामी डेव्हलपर्स, मधू विठ्ठल रियल्टी

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...