Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशएप्रिलमध्ये GST गोळा करण्याचा नवा विक्रम; १.६८ लाख कोटींचे संकलन

एप्रिलमध्ये GST गोळा करण्याचा नवा विक्रम; १.६८ लाख कोटींचे संकलन

मुंबई | Mumbai

एप्रिल महिना सरकारसाठी चांगला गेला असून जीएसटी कलेक्शन (GST Collection) ने सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत.

- Advertisement -

गेल्या महिन्यात GST संकलन १.६८ लाख कोटी रुपये झाले. GST लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच GST संकलनाने एकाच महिन्यात १.५० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थ मंत्रालयाने आज (रविवार) ही आकडेवारी जाहीर केली.

‘प्रार्थना’चं निखळ सौंदर्य हिरव्या पैठणीत खुललं, पाहा PHOTO

एप्रिल २०२२ मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन १,६७,५४० कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी (CGST) अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी ३३,१५९ कोटी, एसजीएसटी (SGST) अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ४१,७९३ कोटी, आयजीएसटी (IGST) म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी ८१,९३९ कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या ३६,७०५ कोटींसह) आणि उपकर १०,६४९ कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या ८५७ कोटींसह).यांचा समावेश आहे.

‘श्रुती हसन’चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

एप्रिल २०२२ मध्‍ये झालेले सकल जीएसटी संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन आहे. त्या आधीच्या महिन्यात नोंदवण्यात आलेल्या १,४२,०९५ कोटी रुपये जीएसटी संकलनाच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन २५,००० कोटी रुपयांनी अधिक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला ३३,४२३ कोटी रुपये आणि सीजीएसटीला २६९६२ कोटी रुपये चुकते केले आहेत. नियमित समझोत्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ६६५८२ कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी ६८,७५५ कोटी रुपये आहे.

‘शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

- Advertisment -

ताज्या बातम्या