Monday, November 25, 2024
HomeनाशिकLadki Bahin Yojana : पालकमंत्री भुसेंनी घेतला बँकेतील महिलांच्या गर्दीचा आढावा

Ladki Bahin Yojana : पालकमंत्री भुसेंनी घेतला बँकेतील महिलांच्या गर्दीचा आढावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नाशिक येथे पाहणी केली. शहरातील द्वारका येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत जाऊन महिलांच्या गर्दीची व निधी वितरणाच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी त्याठिकाणी येणार्‍या अडचणींचा आढावा घेतला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Suicide News : शहरात तिघांनी संपविले जीवन

यावेळी भुसे यांनी बँकेच्या (Bank) रांगेत असलेल्या महिलांशी (Women) तसेच बँक प्रशासनाशी संवाद साधून येणार्‍या अडचणींची माहिती घेतली. तसेच वाढणार्‍या गर्दीचा (Crowd) विचार करुन बँक प्रशासनाला काउंटर वाढविण्याच्या देखील सूचना केल्या.

हे देखील वाचा : Nashik News : पोलिस व प्रशासनाने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळल्याने पालकमंत्री भुसेंकडून कौतुक

अपोलो रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस

जुन्या नाशिकमध्ये (Nashik) अचानक झालेल्या दगडफेकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांपैकी ५ पोलिस अधिकारी व ९ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच जखमी नागरिक आणि पोलिसांचीही यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्ष भेट घेत विचारपूस केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या