Monday, November 25, 2024
Homeनाशिकसमाजातील सर्व घटकांचा विकास हाच शासनाचा ध्यास - पालकमंत्री भुसे

समाजातील सर्व घटकांचा विकास हाच शासनाचा ध्यास – पालकमंत्री भुसे

नाशिक | Nashik

राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे. तसेच शासनाने समाजातील सर्व घटक केंद्रीत करुन त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

- Advertisement -

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपायुक्त मंजिरी मनोलकर, उपायुक्त राणी ताटे आदिसह विविध मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

यावेळी भुसे म्हणाले की, महिला सक्षमीकरण हे शासनाचे महत्त्वाकांक्षी धोरण आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रूपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेचे सात लाख १६ हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला साधारण सोळा ते सतरा लाख महिला प्रवाशांनी लाभ घेतला. तसेच गौरी गणपतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’च्या साठी जवळपास आठ लाख 36 हजार किटची मागणी करण्यात आली असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलेंडरचे मोफत पुनर्भरण अशा अनेक योजनांतून माता भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले.

भुसे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून रोजगार इच्छुकांना विद्यावेतनासह शिकाऊ उमेदवारी दिली जात असून त्यासाठी जिल्ह्यात जवळपास दहा हजार रिक्त पदांसाठी पाच हजारहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तसेच, गेल्या दोन वर्षात सर्व विभागांच्या अनुकंपा तत्वावरील साधारण साडेसातशे उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता देताना जिल्ह्यातील सव्वा चार लाखहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास ८९ कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे. जवळपास ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण ४९७ कोटी ९१ लाख रूपये रक्कम डीबीटी मार्फत अपलोड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून आजअखेर पावणेदोन लाखहून अधिक लाभार्थींना शंभर कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे, असेही भुसेंनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik News : अद्वय हिरेंना दिलासा; नऊ महिन्यांनी तुरुंगातून सुटका

तसेच एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील ५२ हजार ८३४ आयुष्यमान गोल्डन कार्डधारकांना लाभ देण्यात आला. यासाठी १०७ कोटी ४८ लक्ष रुपये अदा करण्यात आले आहेत. तर सुपर फिफ्टी या नाविन्यपूर्ण उपक्रमातून ग्रामीण भागातील ७ परीक्षार्थींनी जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे पालकमंत्री भुसे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व अधिनस्त कार्यालये यांच्या वीजबिल बचतीसाठी एक मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला नाविन्यपूर्ण योजनेखाली मान्यता देण्यात आली आहे. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी ८० विक्री केंद्रे व १०२ उमेद मार्टसाठी सात कोटींचा निधी देण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून ९२ जिल्हा परिषद शाळांना सौर उर्जेद्वारे वीज पुरवठ्यासाठी पावणे सात कोटीहून अधिक रकमेच्या निधीला मान्यता दिली असल्याचेही भुसे यावेळी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या