Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : पालकमंत्री दादा भुसेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

Nashik News : पालकमंत्री दादा भुसेंनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

नारपार योजनेमुळे शेतकरी होणार सुजलाम सुफलाम

नाशिक | Nashik

उत्तर महाराष्ट्राला (Uttar Maharashtra) जलस्वयंपूर्ण करणाऱ्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी (Governor) मंजुरी दिल्याने कसमादेसह खान्देशातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प (Project) व्हावा यासाठी मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर बैठका घेत वरिष्ठ स्तरावर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. या मंजुरीनंतर मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आभार व्यक्त केले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला (Nar-Par-Girna River Linking Project) राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी मंजुरी दिली आहे. नारपार योजनेमुळे शेतकरी (Farmer) हा सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांच्या संघर्षाला न्याय महायुती सरकारने दिला असून आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले. मात्र, आपल्या सरकारने न्याय दिल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले. या मंजुरीबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मंत्री दादा भुसे यांनी आभार मानले.

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीने काही नेत्यांना…”; ठाण्यातील राड्यानंतर राऊतांचा मनसेवर निशाणा

या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, सटाणा, नांदगाव व इतर तालुक्यांना होणार आहे. ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : “तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही”; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास जाऊन मिळणाऱ्या नार-पार व संभाजीनगर या तीन पश्चिम वाहिनी नद्यांवर नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा तालुक्यात ९ धरणे बांधून या धरणातून पाणी उपसा करून गिरणा उपखोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले. या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यांतील २५ हजार ३१८ हेक्टर, जळगांव जिल्ह्यातील १७०२४ हेक्टर अशा एकूण ४२ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. यात कळवण तालुक्यातील ८ गावे, देवळ्यातील २१ गावे, मालेगाव तालुक्यातील २२ गावे, भडगाव तालुक्यातील २३ गावे, एरंडोल तालुक्यातील २२ गावे, चाळीसगाव तालुक्यातील दोन गावांना लाभ होणार आहे.

हे देखील वाचा : Nashik News : मंगळवारी शहरात मराठा माेर्चा; शहर वाहतूकीत बदल

दरम्यान, या बहुप्रतिक्षित महत्वकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे मंत्री दादा भुसे यांनी आभार मानले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या