Monday, November 25, 2024
HomeनाशिकNashik Rain Update : पालकमंत्री भुसेंनी गोदाघाटावर जाऊन घेतला पाणी पातळीचा आढावा

Nashik Rain Update : पालकमंत्री भुसेंनी गोदाघाटावर जाऊन घेतला पाणी पातळीचा आढावा

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

नाशिक | Nashik

गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे नाशिक शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गोदाघाटावर जाऊन पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain Update : नाशकात पावसाची संततधार, तर त्र्यंबकला ‘जोर’धार; नागरिकांचे हाल

पालकमंत्री भुसे यांनी नाशिक शहरातील (Nashik City) होळकर पुलावर (Holkar Brige) जाऊन पाणी पातळीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. त्यासोबतच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून नागरिकांनी सहकार्य करत खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी केले.सध्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा :  Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

दरम्यान, गंगापूर धरण (Gangapur Dam) ८९.८४ इतके टक्के भरले असून या धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सकाळी ६ वाजता गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. यानंतर सकाळी ९ वाजता हा विसर्ग १२०४ क्यूसेकने कमी करून एकूण ७ हजार २२४ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी तीन वाजता गंगापूर धरणातून या पाण्याचा विसर्ग एकूण ८ हजार ४२८ क्यूसेक इतका करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्याटप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या