Sunday, December 15, 2024
Homeजळगावजळगाव ग्रामीणमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दबदबा कायम

जळगाव ग्रामीणमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दबदबा कायम

जळगाव /धरणगाव- प्रतिनिधी –

जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक पार पडली. ३२ पैकी ५ ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे रविवारी २७ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १७ व धरणगाव तालुक्यातील १५ अश्या ३२ पैकी २७ ग्राम पंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला भरोसा कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेनेचे गावकारभारी निवडून आणण्यात जवळपास ९५ % यश प्राप्त करण्यास यश आले असून पुन्हा एकदा जळगाव ग्रामीणमधील जनतेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरच भरोसा कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

जळगाव ग्रामीणमधील जनतेने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागात शेत रस्ते, शिवरस्ते, ग्रामीण भागातील रस्त्यांची केलेली विविध विकास कामे, विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना, गावातील अंतर्गत रस्ते, आरोग्याची कामे व तळागाळातीलजनतेपर्यंत असलेला संपर्काच्या जोरावर जनता ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच असून जळगाव ग्रामीण मतदार संघाचे गडकरी म्हणून गुलाबराव पाटीलच आहे. हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

अजिंठा विश्राम गृहात सकाळी १० वाजेपासून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जवळपास सर्वच विजयी सरपंच व सदस्य यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी सर्वनवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, जिल्हापरिषद सदस्य पावन सोनवणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ पैकी २७ ग्राम पंचायतींमध्ये शिवसेनेचाच भगवा !

जळगाव तालुक्यातील जामोद – सतीलाल मधुकर पाटील बिनविरोध , पळसोद -राधाबाई पंकज पाटील , खेडी खु. – तेजस कैलास चौधरी, लोणवाडी खु. – अनिता बळीराम धाडी , निमगाव – अक्षय युवराज पाटील, सुभाषवाडी – जयश्री राजाराम राठोड , पाथरी – वैजन्ताबाई मगन शिरसाठ , डोमगाव – विनिता अशोक मंडपे , बेळी – तुषार दिगंबर चौधरी , बिलवाडी – विनोद श्रावण पाटील, धामणगाव – निशिगंधा अनिल सपकाळे , आमोदे बु. भूषण दीपक सूर्यवंशी , विटनेर – नेहा ललित साठे, यांच्यासह १५ पैकी १३ ग्राम पंचायती वर ना. गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व राहिले असून धरणगाव तालुक्यातील, चांदसर – बेबाबाई विश्वास सोनवणे, बिनविरोध , तरडे खु. – कलाबाई पांडुरंग भिल, बिनविरोध , वराड खु. – कलाबाई अशोक भिल, बिनविरोध , भोद खु. – विजय पंडित पाटील बिनविरोध, निमखेडा – सयाबाई ईश्वर पाटील, झुरखेडा – सुरेश गोरख पाटील, बाभूळगाव – पवन गजाजन पाटील, पाळधी बु. – विजय रूपसिंग पाटील, वाकटूकी – सुरेश पोपट पाटील, टहाकळी खु. – सविता सुरेश कोळी , खामखेडा – धिरज गणेश पाटील, कल्याणे होळ – कमला भीमसिंग पाटील, फुलपाट – मंगलाबाई दत्तू पाटील, भोद बु. – चंद्रकांत महारु बागुल, येथे बाळासाहेबांच्या शिवसनेचा भगवा फडकला असून डॉ. हेडगेवार नगर – सविता धनराज सोनवणे, बोरखेडा – विजय माणिक पाटील, अंजनविहीरे – गणेशकांत गुलाबराव चव्हाण, सतखेडा – दिपाली किरण पाटील या गावांमध्ये भाजपा व अपक्षांनी बाजी मारली आहे.

३२ ग्रामपंचायतीत २७७ पैकी तब्बल २०२ सदस्य बाळासाहेब सेनेचेच

जळगाव तालुक्यात १५ ग्रामपंचायतीत एकूण १२७ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक झाली असून यातील बाळासाहेब शिवसेनेचे १२७ पैकी तब्बल १०२ सदस्य तर धरणगाव तालुक्यात १७ ग्रामपंचायतीत एकूण १५० ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक झाली यातील बाळासाहेब शिवसेनेचे तब्बल ९९ सदस्य निवडून आले आहेत असे एकूण शिंदे गटाचे ३२ ग्रामपंचायतीत २७७ पैकी तब्बल २०१ सदस्य निवडून आल्याने एका हाती सत्ता मिळविण्यात सहीने गटाला यश प्राप्त झाले आहे.

तळागाळातील कार्यकर्त्यांचा व सर्वसामान्य जनतेचा हा विजय जिल्ह्यासह राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीने सर्वाधिक यश मिळविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या मुद्याला ग्रामीण भागातील जनतेने जोरदार प्रतिसाद दिला आहे. जळगाव ग्रामीणमध्ये ३२ पैकी तब्बल २७ ग्रामपंचायतींवर शिंदे गटासह महायुतीने वर्चस्व प्राप्त केले आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे साहाजिकच ग्रामपंचायत निकालाच्या यशात तळागाळातील कार्यकर्ते, सर्वसामान्य मतदार यांचा सिंहाचा वाटा आहे. आजचा विजय खर्‍या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा व सर्वसामान्य जनतेचा हा विजय असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

– पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या