अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी (दि. 9 जुलै) जिल्हा दौर्यावर येत असून ते संगमनेर आणि नगर येथे बैठक घेणार आहेत.
- Advertisement -
सकाळी ते मुंबईहून संगमनेरला येऊन तेथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेणार आहेत. संगमनेर तालुक्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा आढावा ते घेणार आहेत.
त्यानंतर नगरला येऊन दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि व्यवस्थापक जिल्हा बँक यांच्या समवेत नियोजन समिती सभागृहात आढावा घेणार आहेत.