Monday, November 25, 2024
Homeनगरसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करा - ना. विखे

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करा – ना. विखे

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाचे काम आषाढी वारीपूर्वी निर्धारीत वेळेत पूर्ण करा. हे काम करताना कामाची गुणवत्ता राखा, वारकर्‍यांसाठी तयार होत असल्याने या मार्गाच्या कामाबाबत अधिकार्‍यांनीही अधिक सजग राहून हे काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी आणि दिंडी सोहळा हा संगमनेर तालुक्यातून मार्गस्थ होत असतो.

- Advertisement -

सिन्नर हद्द ते पारेगाव बुद्रुक या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून होतच नव्हते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 2 कोटी 30 लाख 87 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून 20 जून रोजी मार्गस्थ होणार आहे. 27 जून रोजी परंपरेप्रमाणे तालुक्यातील पारेगाव येथे या पालखीचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर या पालखी मार्गाच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतली. तसेच या मार्गाच्या कामाबाबत प्रांताधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार मंगळवारी प्रांताधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कामाची पाहणी केली आहे. सदर मार्गाचे काम अधिक दर्जेदार आणि गुणवत्तेने पूर्ण करावे. महायुती सरकारने या मार्गाला मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. एका आध्यात्मिक कार्यासाठी हा मार्ग होणार असल्याने या कामाचे वेगळेपणही दाखवून द्या, अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या