Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रनिर्बंधमुक्त महाराष्ट्रातील पहिला सण! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, शोभायात्रांची धूम... पाहा VIDEO

निर्बंधमुक्त महाराष्ट्रातील पहिला सण! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, शोभायात्रांची धूम… पाहा VIDEO

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे (COVID 19) आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामध्येच गुढी पाडव्याचा (Gudi Padwa 2022) देखील समावेश होता.

मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. राज्यभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात असून गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा (shobha yatra) उत्साह दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी लेझीम, शोभायात्रा, तलवारबाजी, फुगडी, पारंपारिक वेशभूषा, शिवाजी महारांजी वेशभूषा, श्रीराम यांची पालखी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच महिला बाईकस्वार, ध्वज, लेझिम पथक, ढोल-ताशा, रणमैदानी खेळांची प्रत्याक्षिकं इ. सर्व गोष्टी च्या नागरिकांना गेली दोन वर्ष अनुभवता आल्या नव्हत्या त्या करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या