Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याRahul Gandhi : राहुल गांधी यांना मोठा धक्का! गुजरात न्यायालयाने 'ती' याचिका...

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना मोठा धक्का! गुजरात न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा झटका बसला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. मोदी आडनावाशी संदर्भात केलेल्या विधानाप्रकरणी सुनावलेल्या शिक्षासंदर्भात आज (7 जुलै ) राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाच्या निर्णयमुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार आहे. राहुल गांधीसांठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. (Rahul Gandhi in the defamation case against ‘Modi surname’ remark)

- Advertisement -

मुंबई हादरली! हात-पाय तुटलेल्या अवस्थेत गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

निकाल सुनावतेवेळी न्यायालयाच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांच्या विरोधात किमान 10 खटले विचाराधीन आहेत. हा खटला दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात आणखी काही तक्रारी आल्या आहेत. एक तक्रार तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वंशजांनी सुद्धा दाखल केली. अशात त्यांना दोषी ठरवले जात असेल तर त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. आम्हाला कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची काहीच गरज वाटत नाही. त्यामुळे, राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही.

काय आहे मोदी आडनाव प्रकरण?

2019 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभेत मोदी आडनावाबाबत विधान केले होते. म्हटले होते – सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते. यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला.

Crime News : विळ्याने वार करत मुलाने केली सावत्र आईची हत्या, कारण ऐकून धक्का बसेल

- Advertisment -

ताज्या बातम्या