नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गुजरातच्या वडोदरामध्ये एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. मधल्या सुट्टीत मुले जेवण करत असताना अचानक वर्गाची भींत कोसळली. त्यामुळे सहा विद्यार्थी बेंचसह पहिल्या माळ्यावरून १० फूट खाली पडले. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा शहरातील नारायण विद्यालयात ही घटना घडली. या शाळेत पहिल्या माळ्यावरील एका वर्गात मुले मध्यल्या सुट्टीत जेवण करत होती. त्यावेळी अचानक वर्गाची भींत कोसळली. या घटनेत सहा विद्यार्थी बेंचसह १० फूट खाली पडले. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. “आम्ही अचानकपणे मोठा आवाज ऐकला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एका मुलाच्या डोक्याला मार लागला आहे. या घटनेनंतर आम्ही इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठाकणी नेले,” असे त्यांनी सांगितले.
ही घटना घडताच शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला दिली. अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले. तसेच जखमी विद्यार्थांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा