Tuesday, June 25, 2024
Homeदेश विदेशगुजरात, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; धरण ओव्हर फ्लो, अनेक गावांना पुराचा...

गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; धरण ओव्हर फ्लो, अनेक गावांना पुराचा फटका

गुजरात | Gujrat

- Advertisement -

गुजरात आणि मध्य प्रदेशमधील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. आसपासच्या परिसरांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये मुसळधार पावसामुळे वानाकबोरी धरण ओसंडून वाहत आह. त्यामुळे परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशात चंबळ आणि शिप्रा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. तर रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.

अनेक इमारतींमध्ये पाणी शिरले असून जवळपास ४ फूटापर्यंत पाण्याची पातळी आहे. यामुळे काही घरांमधील लोकांना छतावर रहावे लागत आहे. बचावपथक अडकलेल्या लोकांना बोटीतून बाहेर काढत आहे. सरदार सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने भरूचमध्ये नर्मदा नदीला पूर आला आहे.

LIC कर्मचारी, एजंटसाठी अर्थ मंत्रालयाकडून ग्रॅज्युएटी मर्यादेत वाढीसह ‘या’ मोठ्या घोषणा

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, गावांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत साडेचारशे नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

नर्मदा नदीचे पाणी वाढल्याने नर्मदा, भरूच आणि वडोदरा जिल्ह्यात नदी किनारी गावांना इशारा दिला होता. केवडिया कॉलनीत सरदार सरोवर धरणाचे ३० पैकी २३ गेट शनिवारी उघडण्यात आले. यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी नर्मदा जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज आणि आयटीआय बंद ठेवण्याचे आदेश जारी केले.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर ट्रेन वाहतूकही रविवारी रात्रीपासून बंद केली होती. पश्चिम रेल्वेने सोमवारी याबाबत माहिती दिली. रविवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पूल नंबर ५०२ वर नर्मदा नदीचे पाणी धोका पातळीच्या वर वाहत होते. त्यामुळे वडोदरा इथल्या भरूच आणि अंकलेश्वर स्टेशनवर रेल्वे वाहतूक थांबवली होती. गुजरातच्या अनेक भागात रविवारी मुसळधार पाऊस झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. मंदसौर, अलीराजपूर, झाबुआ आणि रतलाम आदी ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणांना रेड अलर्ट जारी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या