Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबारदान दुकानाला आग

बारदान दुकानाला आग

लाखो रुपयांचे बारदान जळून खाक

- Advertisement -

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

येथील विंचूर रोडवरील जितेंद्र ओधवजी चोथानी यांच्या बारदान दुकानाला आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने संपूर्ण बारदान दुकान अग्नीच्या भक्षस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे बारदान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

लासलगाव विंचूर रोडवर जितेंद्र ओधवजी चोथाणी यांचे बारदान पिशवी चे दुकान आहे यामध्ये पिशव्या तयार करण्याचे काम चालते मंगळवारी सायंकाळी सात वाजेनंतर दुकानाला अचानक आग लागल्याने बारदानाने पेट घेतला दुकानाचे शटर तोडून आग विजवण्याचे काम चालू होते दोन ते तीन तासानंतर आग आटोक्यात आली अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही या घटनेत लाखोचे कांद्याचे बारदान जळून खाक झाल्याने प्रथम दर्शनी समजते दुसऱ्या मजल्यावर मागील बाजूस चोथाणी कुटुंब राहत होते त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आग लागल्याची समजतात येथील सेवाभावी मंडळींनी आग विजेनासाठी शर्तीचे प्रयत्न केले. येथील सामाजिक कार्यकर्ते डी .के. नाना जगताप यांचा पाणी टँकर व छोटे टँकर यांच्या मदतीने सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर पिंपळगाव बसवंत येवला चांदवड येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आग आटोक्यात आली. शेजारी असलेले महावीर ट्रेडिंग किराणा दुकानातील किराणा माल व पसंती कलेक्शन कापडाच्या वस्तू हलवण्यात आल्या.

  • लासलगाव अग्निशामक बंब प्रश्न पुन्हा ऐरणीवर
    नावालाच आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली कांद्याची बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या कांदा नगरीत साधी अग्निशामक दलाची गाडी ही नाही, गेल्या अनेक वर्षापासून घडणाऱ्या घटनांना बाहेरून अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध करावे लागतात. लासलगावच्या सेवेसाठी सदर अग्निशालक बंब कधी येणार हा “यक्ष” प्रश्न लासलगावकरांना पडला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...