Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्या‘देशदूत’चा आज ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा

‘देशदूत’चा आज ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महानगर आणि जिल्ह्यात अनेक शिक्षक सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ कडून शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा आयोजित केला आहे.

शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 या दिवशी मान्यवरांच्या हस्ते विविध शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. एनराईज-बाय सयाजी, इंदिरानगर या हॉटेलमध्ये दुपारी 4.15 पासून कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास समिती सदस्य जीतूभाई ठक्कर आणि गुरू गोविंदसिंग शैक्षणिक संस्था सदस्य तथा माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित शिक्षक आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही हे प्रोत्साहन ठरते.

आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. अशा कर्तव्यनिष्ठ शिक्षकांंच्या तळमळीला आणि उत्कटतेला सलाम करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी, या उद्देशाने ‘गुरु सन्मान पुरस्कार’ आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या