नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR
धानोरा-नंदुरबार रस्त्यावर सुंदर्दे बस स्थानकाजवळ एका वाहनातून महाराष्ट्रात बंदी (Banned) असलेला ३२ लाख ३ हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा (aromatic tobacco) साठा उपनगर पोलिसांनी (Suburban Police) सापळा (Trapped)रचून ताब्यात (arrested) घेतला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना आज दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी गुजरात राज्यातून नंदुरबार मार्गे अशोक लेलँड कंपनीच्या चारचाकी वाहनातून सुगंधीत तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार श्री.पाटील यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना कारवाईचे आदेश दिले.
श्री.भदाणे यांनी धानोरा-नंदुरबार रस्त्यावर सुंदर्दे बसस्थानकाजवळ सापळा रचला. धानोरा ता. (नंदुरबार) गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे (क्रमांक एम एच ३९ ए डी १८७७) चारचाकी वाहन भरधाव वेगाने येतांना दिसुन आले.
पथकातील अंमलदारांनी वाहन थांबविले. वाहनातील सचिन भगवान पाटील (४५, रा.प्लॉट नं.18 बीए शुभम पार्क, सहारा टाऊन ए नंदुरबार, रत्नदिप वासुदेव पाटील ऊर्फ राकेश किशोर राजपुत (32, रा.शिवाजी रोड, चैतन्य चौकदोशिया मशिद समोर, जळका बाजार, नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या. त्यात महाराष्ट्रात बंदी असलेली सुगंधीत तंबाखू मिळुन आली. संशयितांनी सादर माल गुजरात राज्यातील निझर येथुन विकत आणल्याचे सांगितले.
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी
वाहनात ४४ खाकी रंगाच्या गोण्यांमध्ये १९ लाख १६ हजार ६४० रुपये किमतीचा विमल पान मसाल्याचा गुटखा आढळून आला. तसेच १७ पांढऱ्या गोण्यांमधे २ लाख ७० हजार ६०० रुपये किमतीचा व्ही 1 तंबाखू आढळून आले. १ लाख ३३ हजार रुपये किमतीचे विमल गुटखा असलेले एक हजार लहान पाकिटे आढळून आले. ३३ हजार ८०० रुपये किमतीचा व्हीं 1 गुटखा, ४७ हजार रुपये किमतीचा विमल मसाला, ३ हजार रुपये किमतीचे व्ही 1 गुटखा व ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण
३२ लाख ३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भा.द.वि.कलम २७२, २७३, ३२८ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३६(२)(आय) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनालीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
सदर सुगंधीत तंबाखू ही कोणाकडून विकत आणली तसेच कोणास विकण्यास जात आहे याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून दोषींविरुध्द् कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, सहा. पोलीस उप निरीक्षक पानाजी वसावे, पोलीस अंमलदार विलास वसावे, विपुल पाटील, बाबुराव बागुल व होमगार्ड हेमंत राजपुत यांच्या पथकाने केली.