पेठ | प्रतिनिधी | Peth
राज्य सरकारकडून प्रतिबंधित गुटखा (Gutkha) तस्करी रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येऊनही झटपट पैसा मिळविण्याच्या धंद्यात वाढ होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या अवैध गुटख्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशातच आता जिल्हा ग्रामीणच्या विशेष पथकाने पेठमधील वांगणी शिवारात (Wangni Shivar) पिकअपसह ८ लाखांचा गुटखा जप्त (Sezied) केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी पहाटेच्या सुमारास जिल्हा ग्रामीणच्या पथकाने (Team of District Rural) वांगणी शिवारातील आईसाहेब ढाब्याजवळ संशयित वाहन एमएच १५ जीसी ३४१७ याची झडती घेतली असता त्यातील ५ पोत्यांमध्ये १ लाख ७४ हजार २४० रुपयांची १९८ रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ८८० पाकीटे आढळून आले. याशिवाय २४ हजार २०० रुपये किंमतीची २२ रुपये किंमत असलेली तंबाखूची ११०० पाकीटे तसेच १ लाख ५३ हजार ६०० रुपये किंमतीचे पानबहार मसाला व १९ हजार २०० रुपये किंमतीची तंबाखू असा एकूण ०३ लाख ७१ हजार २४० रुपयांचा गुटखा आणि ५ हजारांचा विवो कंपनीचा मोबाईल व ५ लाख रुपये किंमतीची पिकअप असा एकूण ८ लाख ७९ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी विशेष पथकातील अजय महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शुभम सुभाष पाटील रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, सुभाषरोड, नाशिकरोड, कृष्णा सानप, नाशिक आणि सुतारपाडा येथील दुकानदार सुनिल चौधरी यांच्याविरुध्द गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.