Sunday, June 30, 2024
Homeक्राईमNashik Crime News : घरझडतीत दीड लाखांचा गुटखा जप्त

Nashik Crime News : घरझडतीत दीड लाखांचा गुटखा जप्त

पानटपरीचालक अटकेत; युनिट दाेनची सारडा सर्कलवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

किरकाेेळ दुकानदारांना गुटखा (Gutkha) विक्री करणाऱ्या परप्रांतीय पानटपरीचालकास युनिट दाेनच्या पथकाने गजाआड केले आहे. त्याच्या घरझडतीत पथकाच्या हाती एक लाख ४० हजारांचा गुटखा हाती लागला असून याबाबत मुंबईनाका पाेलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा : Nashik Crime News : खैरतस्कर ‘पुष्पा’ जेरबंद; वनविकास महामंडळाची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद माजीद सुफीयान खान (२०, रा. मातृछाया बिल्डींग मदिना चौक, सारडा सर्कल रोड, मूळ रा. मदारपूर, मेहनगर, आझमगढ, उत्तरप्रदेश) असे संशयित पानटपरी चालक व गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. खान हा पानस्टॉल चालक असून तो दुकानात राजरोसपणे प्रतिबंधित गुटखा विक्री करीत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अंमलदार वाल्मिक चव्हाण यांना मिळाली होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘हाक मराठी’चा मास्टरमाईंड अटकेत

त्यानुसार रविवारी (दि. २३) पथकाने सारडा सर्कल (Sarda Circle) रस्त्यावरील मदिना चौकात सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळ्यात अडकला. चोरी-छुपी विक्रीसाठी तो गुटख्याचे पुडे दुकानात नेत असतांना सापडला. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरात राजनिवास, विमल आणि इतर नावांचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा(जर्दा)साठा असा सुमारे १ लाख ३९ हजार ५१६ मुद्देमाल मिळून आला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर भामट्यांनी डॉक्टरला घातला तब्बल ‘इतक्या’ लाखांना गंडा

दरम्यान, शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार प्रविण वानखेडे यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे, राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, सुनील आहेर, अतुल पाटील यांनी कारवाई केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या