यावल| प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावी श्रीराम मंदिराचे शेजारी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एका किराणा दुकान चालकाकडून विमल गुटखा मोठ्या प्रमाणावर गावात व संपूर्ण तालुक्यात तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती फैजपूर विभागाच्या पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांना मिळताच त्यांनी पथक निर्मित करून या गावी येऊन जगन्नाथ विठ्ठल पाटील यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेतले व त्यांच्या गोदामातून विक्री होत असलेल्या गुटख्याची मिळवून सदर ठिकाणी जाऊन दोन लाख ५१ हजार ४२ रुपये किमतीचा गोवा पान मसाला, विमल गुटखा प्रीमियम राजनिवास व जाफरानी जळगाव असे वेगवेगळ्या प्रकारचे नशा येणारे विमल गुटके जप्त करून त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फैजपुर पोलीस विभागाच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून किनगाव बुद्रुक तालुका यावलगावी श्रीराम मंदिराजवळ अनिल किराणा दुकानात व त्यांच्या मालकाच्या गोदामातून विमल गुटख्याची विक्री होत असल्याची गुप्त बातमी दाराकडून खबर मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांनी एक पथक निर्मिती केले. त्यांच्या कार्यालयातीलच या गुन्ह्यातील फिर्यादी अल्ताफ अली सय्यद, सुनील पाटील, गणेश मनोरे, सुमित बाविस्कर यांना बोलावून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली व त्यांचा ताफा थेट किनगाव गाव गाठले.
या ठिकाणी जाऊन त्यांनी किनगाव बुद्रुक गावातील अनिल किराणाचे मालक जगन्नाथ पाटील श्रीराम मंदिराचे शेजारी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी रहिवासाचा पत्ता पाटील वाडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असे सांगितले. सदर बाबत आम्ही तुमची चौकशी करीत आहोत असे सूचित केले व त्याला आपण विमल गुटखा बेकायदेशीर रित्या विक्री करीत आहात आपल्या दुकानाची झाडाझडती घेतली या ठिकाणी मात्र काही मिळून आले नाही.
जगन्नाथ विठ्ठल पाटील यांना विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता किनगाव गावात जळगाव ज्वेलरीचे दुकानाचे बाजूस माझे दुकान असून ते भाजीपाला विक्रीसाठी भाड्याने दिले आहे असे सांगितले. या ठिकाणी या पथकाने जाऊन दुकानाची मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत प्रतिबंधित केलेल्या गुटखा पान मसाला केसरीयुक्त पान मसाला पाकिटे मोठ्या गोण्यांमध्ये ठेवला आहे. माझ्यासोबत चला मी दाखवतो असे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी सदरची पथक गेले असता मिळालेल्या गुप्त बातमीवरून विमल पान मसाला, प्रीमियम राजनिवास पान मसाला, गोवा पान मसाला, व्ही वन टोबॅको, करमचंद प्रीमियम पान मसाला, के सी२००० जाफरानी जरदा राजनिवास पान मसाला असे पंधरा प्रकारचे वेगवेगळे असलेले एकूण दोन लाख ५१ हजार ४२ रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांग समक्ष पंचनामा करून जप्त केला.
याबाबत पोलीस नाईक ङ्गिर्यादी अल्ताङ्ग अली सय्यद फैजपुर पोलीस उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात भादवी कलम ३२८; १८८; २७२ ;२७३ अन्वये आरोपी जगन्नाथ विठ्ठल पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व स्टॉप करीत आहे.
यावल तालुक्यात किनगाव साखळी आणि यावल येथे गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून सदर नशिले पदार्थ विक्रीस येत असतात. अशी चर्चा असून सदर विक्री करणार्या अशा व्यावसायिकांविरुद्ध व छोट्या-मोठ्या टपरी दुकानदारांविरुद्ध आता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे समजते.