Friday, May 3, 2024
Homeनगरव्यायाम शाळा होणार सुरू

व्यायाम शाळा होणार सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यातील जीम आणि व्यायाम शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मान्यतेने

- Advertisement -

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढले आहेत.

राज्य सरकारने राज्यात करोना संसर्ग कमी झाल्याने टप्प्याने प्रतिबंधात्मक भागातील उपक्रम सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने करोनाचे नियम पाळून 30 नाव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात जीम आणि व्यायाम शाळा सुरू करण्यास परवागनी दिली आहे. यासह निर्बंध असणार्‍या सेवा सध्या बंद राहणार असून राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा, आदी सुचाना देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या