Monday, November 25, 2024
Homeधुळेबल्हाणे, शेवगे परिसरात वीस मिनिटे गारपीट

बल्हाणे, शेवगे परिसरात वीस मिनिटे गारपीट

पिंपळनेर ।Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेरसह परिसरात आज पाऊण तास पाऊस (rain) झाला. तर बल्हाणे, शेवगे परिसरात 25 मिनिटे गारपीट (hail) झाली. त्यामुळे कांदा, मका, गहू पिकांसह भाजीपाल्याचे (vegetables with crops) नुकसान (damage) झाले आहे. त्यामुळे शेतकरी (farmer) हतबल झाला आहे.

- Advertisement -

पिंपळनेरसह परिसरात आजही बेमोसमी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांची एकच धावपळ उडाली. कांदा मार्केटमध्येही शेतकर्‍यांची धावपळ दिसून आली. पिंपळनेर शहरात अर्धा ते पाऊण तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांची सध्या चालू असलेली कांद्याची काढणी, गहू, मका व उन्हाळी बाजरी पीक शेतात असल्याने या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तर व्यापार्‍यांनीही गहू, कांदा खरेदी केला असून तोही मार्केटला उघड्यावर असल्याने त्यांचेही नुकसान झाले. बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे डांगर व टरबुज शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांवर रमजान सण असल्याने डांगर, टरबुजला चांगला भाव मिळेल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. मात्र गारपीटीमुळे निराशा झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या