Monday, July 22, 2024
Homeनाशिकनिफाड तालुक्यात गारपीट; पाहा Video

निफाड तालुक्यात गारपीट; पाहा Video

निफाड | वार्ताहर | Niphad

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह (Unseasonal rain) गारपीट होत असल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या या अस्मानी संकटाने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून त्याच्या कष्टावर यंदा पाणी फिरल्याचे चिन्हं सध्या दिसत आहे.

या अवकाळी पावसाने येथील जवळपास सर्वच तालुक्यांना फटका बसला असून आज, निफाड तालुक्यात पुन्हा गारपीट झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

निफाड तालुक्यातील कुंभारी व पंचकेश्वर शिवारात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तब्बल वीस मिनिटे गारपीट झाल्याने द्राक्षबागांसह कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

द्राक्षबागांची काढणी सुरू होण्यापूर्वीच हे अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

… म्हणून गोपीनाथ मुंडे ‘लोकनेते’ बिरूदाचे मुकुटमणी होते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisment -

ताज्या बातम्या