Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सराईत घरफाेड्या ताब्यात; १२ लाखांचे साेने हस्तगत

Nashik Crime News : सराईत घरफाेड्या ताब्यात; १२ लाखांचे साेने हस्तगत

युनिट दाेनची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील उपनगर व इंदिरानगर येथे तीन घरफाेेड्या (Robbery) करणाऱ्या जळगावातील एका सराईत घरफाेड्यास गुन्हेशाखेच्या युनिट दाेनने अटक (Arrested) केली आहे. त्याच्याकडून तिन्ही गुन्ह्यांतील १२ लाख रुपयांचे २१ ताेळे साेने हस्तगत केले आहे. चाेरी (Theft) केलेल्या पैसे व साेन्यातून हा चाेरटा पिकअप वाहन घेण्याच्या तयारीत हाेता, अशी माहिती समाेर आली आहे. 

हे देखील वाचा : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळित न झाल्यास…; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय राजू वाघेला (वय २६, रा. गामणे मळा, मखमलाबाद शिवार, नाशिक. मुळ रा. रावेर रेल्वे स्टेशनजवळ, झोपडपटटी, ता. जि. जळगाव) असे सराईत संशयिताचे (Suspected) नाव आहे. त्याच्याकडून आणखीही गंभीर गुन्हे उघड हाेण्याची शक्यता आहे. शहर परिसरातील (City Area) घरफोडी व चाेरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त( गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हेशाखेला आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; नेमबाजीत भारताला मिळवून दिले ‘हे’ पदक

त्या अनुषंगाने संशयित चाेरट्यांचा शाेध सुरु असतानाच (दि.३१) युनिट दाेनचे हवालदार प्रकाश भालेराव व शंकर काळे यांना अजय वाघेला याची गाेपनीय माहिती मिळाली. त्याने शहरात विविध घरफोडी केल्या असून त्याच्याकडे खूप सोने (Gold) आहे. हे सोने विकून तो पिकअप घेणार असल्याची टीप मिळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना कळविली.

हे देखील वाचा : Cloudburst News : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचे रौद्ररुप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

दरम्यान, त्यानंतर सहायक उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, सुनिल आहेर यांनी सिन्नरफाटा येथील महापालिका दवाखान्याजवळून वाघेला यास ताब्यात घेतले. तेव्हा त्याने उपनगर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) दाखल घरफाेडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, गुलाब सोनार, संजय बोडके, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, विजय गांगुर्डे आदींनी कारवाई केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या