Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याVideo: हार्दिक पांड्याने लग्नाची मागणी घालताच ‘तिने केले असे काही’… व्हिडिओ होतोय...

Video: हार्दिक पांड्याने लग्नाची मागणी घालताच ‘तिने केले असे काही’… व्हिडिओ होतोय व्हायरल

दिल्ली:

टीम इंडियाचा अष्टपैलू खेडाळू हार्दिक पांड्याने प्रेमाच्या खेळपट्टीवर दमदार पदार्पण केले आहे. त्याने अभिनेत्री नताशा स्टँकोविच सोबत साखरपुडा केला आहे. पांड्याने त्याचा इंस्टाग्राम पेज वरून नताशा बरोबरच्या साखरपुड्याची घोषणा केली. नताशा बरोबर फोटो पोस्ट करताना हार्दिकने लिहिले आहे की, ‘मैं तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. ०१.०१.२०२० #एन्गेज्ड’. या सोबतच त्याने त्याचा साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “‘हमेशा के लिए हां..” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मागे बर्‍याच कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसले होते. नवीन वर्षात त्याने साखरपुडा करून त्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या अचानक आलेल्या वृत्तामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला आहे. विराटने कमेंट करत या दोघांचेही अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या