Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHardik -Natasa : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक...

Hardik -Natasa : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट

टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून लक्ष वेधणाऱ्या हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) खासगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते.

हार्दिकची पत्नी नताशाने (Natasha Stankovic) मध्यंतरी आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर गुरूवारी रात्री हार्दिक -नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कायदेशीररित्या वेगळं होतं असल्याची (घटस्फोटाची) घोषणा केली. त्यांचा हा निर्णय अनपेक्षित नसला तरी काहींसाठी धक्कादायक होता.

- Advertisement -

हार्दिक पांड्याने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

चार वर्षे सोबत राहिल्यानंतर मी आणि नताशाने आपसी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि आमचे सर्वस्व दिले. वेगळं होणं हे आम्हा दोघांच्या हिताचे असल्याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य या सर्वांचा आम्ही वेगळं होताना विचार केलाय. आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आमच्या जीवनात आलेला आमचा मुलगा अगस्त्या… आमच्या दोघांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असेल आणि सह-पालक म्हणून आम्ही त्याच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी सर्वस्व देऊ. याक्षणी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. अशा या अवघड आणि संवेदनशिल काळात आम्हाला प्रायव्हसी मिळावी, आम्हाला सर्वांनी समजून घ्यावी ही विनंती करतो. अशी पोस्ट हार्दिक आणि नताशाने शेअर केली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

नताशा आणि हार्दिक यांची पहिली भेट २०२८ मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. तेव्हा हार्दिक पहिल्याच नजरेत नताशाच्या प्रेमात पडला होता. यानंतर नताशा हार्दिकच्या वाढदिवसासाठी हजर होती आणि तेथूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल असलेली नताशा स्टॅनकोविक हीने भारतीय क्रिकेट हार्दिक पांड्याशी साखरपुड्याची घोषणा केली आणि ती चर्चेत आली. हार्दिकने नताशाला यॉटवर प्रपोज केले होते.

हे देखील वाचा : IAS वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला अटक

या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांचे फोटोदेखील पोस्ट केले होते ज्यामध्ये नताशा हार्दिकसोबत तिची एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसली होती. जगभरात कोविडची साथ पसरलेली असताना, लॉकडाऊनदरम्यानच हार्दिक आणिइ नताशाने ३१ मे २०२० साली कोर्ट मॅरेज केलं आणि खासगी समारंभात ते विवाहबद्ध झाले. त्यानंतर लगेचच जुलै २०२० मध्ये हार्दिक-नताशाच्या घरी छोट्या पाहुण्याचे, त्यांच्या मुलाचे आगमन झाले. लग्नापूर्वीच नताशा प्रेग्नंट होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या