Sunday, January 25, 2026
HomeनगरAhilyanagar : हरेगावात जागतिक दर्जाचा इंधन प्रकल्प होणार

Ahilyanagar : हरेगावात जागतिक दर्जाचा इंधन प्रकल्प होणार

4 हजार एकर जमिनीचा वापर || गती देण्यासाठी बावनकुळेंच्या अध्यक्षतेत समिती

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या 4 हजार एकर जमिनीवर जागतिक दर्जाचा शाश्वत विमान इंधन (निगेटिव्ह नेट झिरो इंधन) प्रकल्प उभारला जाणार आहे. या भव्य प्रकल्पाला जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. मुंबईतील ‘झेडआरटू ग्रुप होल्डिंग्स लि.’ या कंपनीमार्फत हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाच्या 31 डिसेंबर 2025 रोजीच्या बैठकीत विमान वाहतुकीसाठी लागणारे शाश्वत इंधन तयार करणार्‍या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता या निर्णयाला गती देण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

YouTube video player

या प्रकल्पासाठी शेती महामंडळाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग केली जाईल. सुरुवातीला ही जमीन 49 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिली जाणार असून, पुढील 49 वर्षांसाठी नूतनीकरणाची तरतूदही प्रस्तावात करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 98 वर्षांच्या कालावधीसाठी या जमिनीचा वापर प्रकल्पासाठी होऊ शकतो.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : संचमान्यता, पदोन्नती व समायोजनानंतर शिक्षकांच्या बदल्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर मध्येच होतात. बदलीनंतर शिक्षकांना त्या शाळांमध्ये रुजू होण्यासाठी काही दिवस लागतात. शिक्षक मधूनच...