Saturday, November 23, 2024
HomeमनोरंजनRaju Punjabi : सुप्रसिद्ध गायक राजू पंजाबीचं निधन, ४० व्या वर्षी घेतला...

Raju Punjabi : सुप्रसिद्ध गायक राजू पंजाबीचं निधन, ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्ली | Delhi

हरियाणाचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी या्ंचं निधन झालंय. राजू पंजाबी यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राजू गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. आज मंगळवारी पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासुन ते काविळीच्या आजाराने ग्रस्त होते. राजू यांच्या निधनाची माहिती मिळताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रावतशर, जिल्हा हनुमानगढ, राजस्थान येथे मूळ गावी राजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते हिस्सारच्या आझादनगरमध्ये राहत होते. सध्या त्यांचे चाहते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी जात आहेत. राजू केवळ हरियाणामध्येच नाही तर पंजाबमध्येही खूप लोकप्रिय होता. त्यांची गाणी तरुणाईला खूप आवडतात आणि सपना चौधरीसोबतची त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. ‘देसी देसी’ व्यतिरिक्त त्यांची ‘सँडल’, ‘सॉलिड बॉडी’, ‘तू चीज लाजवाब’, ‘थडा भरतर’, ‘स्वीटी’ ही गाणीही खूप गाजली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या