दोंडाईचा । Dondaicha । श.प्र
येथील पोलिस ठाण्यात नुकतेच रूजु झालेले पोलिस निरीक्षक श्रीराम पवार (PI Shriram Pawar) यांची आज अचानक नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली (Hasty transfer) करण्यात आली. तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेशही सायंकाळी पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांची काढले आहे.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कामकाजासाठी व तात्पुरत्या स्वरूपात ही बदली करण्याचे आल्याचे बदली आदेशात म्हटले असले तरी पोलिस वर्तुळात मात्र उलट-सुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान केलसिंग पावरा यांनी आपल्या पदाचा पदभारही स्विकारला आहे.
Visual Story : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा गुलाबी लुक पाहाल तर तुम्ही व्हाल आशिक…गारबर्डी वनजमिनीवरील ८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश
जिल्ह्यात दोंडाईचा पोलिस ठाणे विविध कारणांवरून नेहमीच चर्चेत असते. या पोलिस ठाण्यात कोणताही अधिकारी जास्त काळ टिकत नाही, असे म्हणतात. मात्र पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी आपला कार्यकाळ पुर्ण केला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांची दोन महिन्यापुर्वीच नियुक्ती झाली. त्यांनी चोरी, घरफोडींवर आळा घातला. अवैध व्यवसायांना लगाम लावला.
पोलिस ठाण्याचे सुरळीत काम सुरू असतांना आज अचानक त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यामुळे पोलिस कर्मचारीही गोंधळात पडले आहेत. दरम्यान नवनियुक्त पोलिस निरीक्षक पावरा हे देखील 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
कोळदा येथील महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना अटक