अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये निर्जंतुकीकरण करून पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहेत. यामुळे जलजन्य आजार विशेष करून जुलाब (डायरिया) ला अटकाव करता येणार आहे. नागरिकांमध्ये जलजन्य आजारा विरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्टदरम्यान स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
अभियानामध्ये सर्व शासकीय विभागाच्या सहकार्याने गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होतात. यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत.
अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्व सांगण्यात येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावणेत येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता चावडी सुरू करणेत येणार आहे.
गावातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचर्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माणकरणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचर्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, यामध्ये कुजनारा व न कुजणारा कचरा यासाठी स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करणे येणार आहे.
अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे.
घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती करण्याची मोहीम ग्रामपंचायतने हातात घेऊन शाळा,अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी शौचालयांची नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता विशेष विशेष स्वच्छता संमेलन भरवण्यात यावे, यामध्ये विद्यार्थी शिक्षक यांचे मध्यान भोजन यासाठीची स्वच्छता व स्वच्छते बद्दल जागृता सत्र घेण्यात येणार आहे. तसेच तसेच गावामध्ये ग्रे वॉटर, ग्रे वॉटर मॅनेजमेंटबाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेणेत येणार आहे.
या अभियानाचा जिल्हा परिषदेत शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सभांजी लांगोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी राहुल शेळके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.