Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र'रेमडेसिवीर'बाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले...

‘रेमडेसिवीर’बाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. करोना रुग्णांची हेळसांड सुरू असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा (Remdesivir) काळाबाजार होत असून मोठ्या प्रमाणात तुटवडा पाहायला मिळतोय.

- Advertisement -

रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता रेमडेसिव्हीरचं वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात आज टोपे यांच्या हस्ते खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना १० हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल असे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकीस्ट राहणार असून त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल. जिल्हाधिकारी खाजगी रुग्णालयाची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करेल. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही अशी माहिती देखील टोपे यांनी दिलीय.

यातून खाजगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील असंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, रेमडेसिव्हिरने मृत्यू दर घटल्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा जगभरात नोंदवला गेला नसला तरी त्याचा वापर अमाप होत आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार तर त्याचा निम्मा गैरवापर होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी असेल आणि रुग्ण व्याधीग्रस्त असेल तरच रेमडेसिव्हिर देण्याची गरज तज्ज्ञांनी नोंदवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या