दिल्ली | Delhi
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन (Heath Streak Passes Away) झाले आहे. आज ( 3 सप्टेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनीही दुजोरा दिला आहे. या आधीही त्यांच्या निधनाच्या बातम्या आल्या होत्या मात्र त्या केवळ अफवा असल्याचे पुढे आले होते. दरम्यान, आता त्यांच्या कुटुंबीयांनीच निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हीथ स्ट्रीक यांची पत्नी नादिनने पतीच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि म्हणाली की, आज पहाटे रविवार 3 सप्टेंबर 2023, माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून गेले. तिने पुढे लिहिले की, त्याला आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत घालवायचे होते. कुटुंबाकडून प्रेम हवे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू.
स्ट्रीक यांनी झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले, त्यांनी अनुक्रमे 1990 आणि 2943 धावा केल्या. तथापि, चेंडूवरील त्याच्या पराक्रमाने त्याला इतरांपेक्षा वेगळे केले. कसोटी क्रिकेटमध्ये 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेऊन, ते झिम्बाब्वेचा सर्वकालीन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.