Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

नाशिक | Nashik

- Advertisement -

आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांत (Shiva Temple) भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या शिवमंदिरांबाहेर रांगा लागल्या आहेत. अशातच आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातून दडी मारलेल्या पावसाने नाशकात (Nashik Rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी

नाशिक शहरातील शालिमार, मेनरोडसह सीबीएस परिसरात पावसाने (Rain) आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. तर नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. तसेच छत्री व रेनकोट न आणलेल्या नागरिकांनी पावसापासून लपण्यासाठी दुकानांच्या गाळ्यांचा आधार घेतल्याचे पाहायला मिळाले. तसेच काल देखील पावसाने नाशकातील (Nashik) काही भागांत हजेरी लावली होती.

हे देखील वाचा : मोठी बातमी! नाशकात एटीएसची कारवाई; बांगलादेशी घुसखोर ताब्यात

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या