Thursday, January 8, 2026
HomeनाशिकRain News : सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

Rain News : सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

सिन्नर | Sinnar

गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील ग्रामीण भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी दुपारी तालुक्यासह शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर (Road) पाणी साचल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

YouTube video player

ग्रामीण भागातील (Rural Area) फरदापुर, मानमोडा, मुसळगाव, दातली, खोपडी, नांदूर शिंगोटे आधी भागात दुपारी तीन वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील (Farm) जमिनीत पाणी साचलेले दिसून आले. रक्षाबंधनच्या (Rakshabandhan) दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने माहेरी निघालेल्या महिलांना पावसामुळे अनेक दुकानांचा तसेच रस्त्यांवर झाडांचा आडोसा घ्यावा लागला. तर नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या (Shops) गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकला भाविकांची मांदियाळी

सिन्नर शहर तालुक्यात विजेच्या कडकडाट अन् वादळीवाऱ्यासह पाऊस

सिन्नर शहर तालुक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. ग्रामीण भागात वादळी वारा व विजेचा कडकडाट असल्याने पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात होता. तर शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतांत पाणी साचलेले होते. तर रस्त्यावरही पाणी वाहताना दिसत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘मुख्यमंत्री पंचायत राज’मध्ये 61 रूपये कोटींची वसुली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सध्या राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी दिलेली सवलत चांगलीच लागू पडली असून दीडच महिन्यात तब्बल 61...