मुंबई | Mumbai
राज्यातील विविध जिल्ह्यांत गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असून कुठे वाहतूकीचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
घृणास्पद! मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करत फिरवले रस्त्यावर; व्हिडिओ व्हायरल
याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) देण्यात आला असून या सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Nashik : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षण भिंतीवर आदळली, दोघांचा मृत्यू
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असून पुढील पाच दिवस मराठवाडा विभाग (Marathwada Division) वगळता तीन विभागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळत आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Irshalwadi Landslide : “अन् आई-बाबांना पळताही आले नाही…”; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम