मुंबई | Mumbai
मागील आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर पावसाने काही भागांत दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी (Farmer) पुन्हा चिंतेत सापडला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे उर्वरित भागात पाऊस कधी कोसळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे…
Chhatrapati SambhajiNagar News : मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; शहरानंतर आता जिल्ह्याचंही नामांतर
हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यासाठी ४० हजार कोटींचे पॅकेज? राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक
त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.