नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विविध भागांत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.
- Advertisement -
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यांत आज पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, सोशल मिडियावर चांदवड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचा जुना विडीयो व्हायरल होत असल्याचे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात दि. १ ते ११ जून पर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आता पुढील काही महिन्यांत अजून पाऊस कोसळणार असून हा पाऊस धरण साठ्यांमध्ये पाण्याची वाढ करण्यासाठी दिलासादायक ठरणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा