ओझे l विलास ढाकणे Oze
दिंडोरी तालुक्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर येत असून तालुक्यातील सर्वच धरणे जवळ जवळ भरलेले असून आज सांयकाळी ६.३० वाजेपर्यत करंजवण धरणातील पाणीसाठा ९३% झाल्यामुळे करंजवण धरणातून कादवा नदी पात्रात १६०० क्युसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणात येणा-या पाणीची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पावसाचा अदांज लक्षात घेता करंजवण धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून ओझे, करंजवण, लखमापूर, म्हेळुस्के येथील नदीवरील पाण्याचा घेवून आपली वाहने व प्रवास करावा असे आवाहन करंजवण धरण कार्यकारी अभियंता भूषण दंडगव्हाळ यांनी केले आहे.
पुणेगाव धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पुणेगाव धरणातून उनंदा नदीत ४५०० क्युसेक्स पाण्याचां विसर्ग करण्यात येत असल्यामुळे आज सकाळी ओझरखेंड धरण पाणीसाठा ८०% होता मात्र दिवसभर धरण परिसर व मांजरपाडा( देवसाने ) प्रकल्पातून हि मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यामुळे ओझरखेंड धरण सांयकाळी ८ वाजेपर्यत १००% भरले असून सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस पडत असल्यामुळे कादवा, कोलवणसह सर्व नद्यानां महापूर येण्याची शक्यता असल्यामुळे आज सायंकाळी पालखेड धरणातून ४७०० क्युसेक्स पाणी कादवा नदीत सोडण्यात आले होते मात्र पश्चिम भागात पावसाचा जोर लक्षात घेता पालखेड धरणातून कदाचित काही तासामध्ये मोठा विसर्ग करण्याची शक्यता आहे. आज पडलेल्या पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणे भरली आहे मात्र जिल्हा प्रशासनाच्या नियमा नुसार करंजवण, पुणेगाव, पालखेड धरणात जमा होण्या पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वाघाड, तिसगाव नंतर आज सांयकाळी ओझरखेंड धरणाच्या साडव्यांतून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे.
दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी नदी, नाले या ठिकाणी प्रवास करताना दक्षता घेण्याचे आवाहन दिंडोरी पेठचे प्रांतअधिकारी आप्पासाहेब शिंदे तसेच दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे व दिंडोरी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी केले आहे.