Saturday, May 17, 2025
Homeनाशिकनाशिकमध्ये अवकाळी पाऊस; शेतमालाचे नुकसान, बळीराजा संकटात

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस; शेतमालाचे नुकसान, बळीराजा संकटात

नाशिक | प्रतिनिधी 

- Advertisement -

नाशिक शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आभाळ भरून येऊन पावसाच्या रिमझिम सरी सुरू झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. दिंडोरी तालुक्यात काही भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. निफाडमध्ये ढगाळ वातावरण असून नाशिक तालुक्यात मात्र पावसाने चांगलीच बटींग केली. यामुळे किरकोळ व्यावसायिकांसह अत्याश्यक सेवेत काम करणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली.

शहरातील काही भागांत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसल्याने गेल्या काही दिवसांपासून झालेल्या उकाड्यापासून नाशिककरांना दिलासा मिळाला.

दिंडोरी तालुक्यातील ओझे ,करंजवण ,नळवाडी ,खेडले ,निगडोळ ,नळवाडपाडा, येथे रिमझिम पाऊस मात्र वातावरणात गारवा तयार झाला आहे. मात्र, याठिकाणी जर पावसाच्या सरी कोसळल्या तर याठिकाणी कांदासह शिल्लक असलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची भीती आहे.

वाडीवऱ्हे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. एकीक्कडे करोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असताना अचानक आलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातातोंदाचा घास हिरावला गेला आहे.

या आठवड्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्रात तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून वातावरणात अस्थिरता आहे.

परिणामी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असतांना अनेक ठिकाणी लहान आकारातील गाराही पडल्या होत्या. आज आलेल्या पावसात मोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब होते. काही भागात गारादेखील पडल्याने गारपीटसारखी परिस्थिती ओढवली होती.

शहरात बत्ती गुल 

नाशिक शहर आणि परिसरात जलधारा कोसळल्यानंतर विजेची बत्ती गुल झाली आहे. गेल्या दोन तासांपासून वीज गेली असून अद्याप ती आलेली नाही. तसेच महावितरणकडून मुसळधार पावसामुळे वीज घालविण्यात आल्याची माहिती युजर्सच्या मोबाईलमध्ये प्राप्त झाली. करोनाच्या शिरकावानंतर सध्या अनेक कंपन्यांची कामे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु आहेत. त्यामुळे या कामांनादेखील ब्रेक अवकाळी पावसामुळे मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ज्योती

Who Is Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती मल्होत्राला कैथल...