Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये धो-धो; गंगापूरमधून विसर्ग वाढवला, 'या' धरणांमधूनही सोडले पाणी

नाशिकमध्ये धो-धो; गंगापूरमधून विसर्ग वाढवला, ‘या’ धरणांमधूनही सोडले पाणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारपासून जोरदार हजेरी लावल्याने अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून आज दुपारी एक वाजता ५२० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला होता. दुपारी २ वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

Video : पावसाचा घाट, स्मार्ट सिटीने लावली नाशिककरांची वाट

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग 520 क्यूसेसने वाढवून 1040 क्यूसेस करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग वाढवला

दरम्यान, नांदूरमधमेश्वर धरणातून आज 300 क्यूसेस विसर्ग सुरु होता. दुपारी 3.00 वाजता पाण्याचा विसर्ग 1314 क्यूसेसने वाढवून एकूण 1614 क्यूसेस करण्यात येणार आहे. कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून पावसाचा जोर असल्याने कडवा धरणातून दुपारी 2 वाजता 848 Cuses ने कडवा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पुणेगावमधून 590 क्यूसेस तर दारणातून 1400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या