नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. अशातच आज दोन दिवसानंतर पुन्हा एकदा पावसाने शहरातील विविध भागात हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
आज सकाळपासून शहरात कडक ऊन होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते.अखेर पाच वाजेच्या सुमारास शहरातील शालिमार, सीबीएस, मेनरोड परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येचा उलगडा
दरम्यान, आज हवामान विभागाकडून (IMD) नाशिकसह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली,सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरात (Nashik City) पावसाने हजेरी लावली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा