Tuesday, July 23, 2024
Homeक्राईमNashik Crime News : अखेर 'त्या' रिक्षाचालकाच्या हत्येचा उलगडा

Nashik Crime News : अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येचा उलगडा

कल्याण व्हाया पुण्यात पळालेल्या चौघा मारेकऱ्यांना अटक; युनिट एकची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

उपनगरीय मार्गावर रिक्षा चालविणाऱ्या मित्रांत पूर्ववैमनस्य आणि आर्थिक वादातून खटके उडाल्याने चौघा रिक्षाचालकांनी संगनमत करुन पाचव्या मित्राची हत्या (Murder) केल्याचे उघड झाले आहे.म्हसरुळ (Mahsrul) येथील औदुंबर लाँन्सजवळ शनिवारी (दि.१५) रात्री घडलेल्या खूनाची उकल करण्यात गुन्हेशाखेच्या युनिट एकला यश आले असून खून केल्यानंतर कल्याण व्हाया पुणे येथे पळून गेलेल्या संशयितांना एकाच वेळी अटक (Arrested) करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय दत्तात्रय आहेर (वय-३०, रा. रामवाडी, पंचवटी), संकेत प्रदीप गोसावी, (वय-२६, रा. जुईनगर, म्हसरुळ), प्रशांत निंबा हादगे (वय-२९, मेहेरधाम, पंचवटी) आणि कुणाल कैलास पन्हाळे (वय वय-३०, रा. मायको दवाखान्याच्यामागे, दिंडोरीरोड, पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. चौघेही रिक्षाचालक असून पंचवटी, सीबीएस आदी मार्गांवर रिक्षा (Rickshaw) प्रवासी भरुन व्यवसाय करतात.

हे देखील वाचा : Nashik News : शहरातील पाणी पुरवठा होणार विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

संशयितांनी (Suspects) शनिवारी रात्री ९ वाजेच्या आसपास रिक्षाचालक प्रशांत अशोक तोडकर(वय २८, रा. हेकरे चाळ, आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) याला मद्यप्राशन करण्यासाठी म्हसरुळ भागातील औदुंबर लाँन्सलगतच्या मोकळ्या जागेत बोलावून घेतले. यावेळी मद्य पित असतांना पाचही जणांत काहीतरी मागील वादातून भांडणे झाली.त्यात चौघा संशयितांपैकी एकाचे मागील अनेक महिन्यांपासून प्रशांतशी वैयक्तिक वाद सुरु होते. दरम्यान, प्रशांत मद्याच्या नशेत धुंद झाल्याचे दिसताच संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड व पेव्हर ब्लॉकचे तुकडे मारुन हत्या केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कट्टा विक्री आले अंगलट; सराईताकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

दरम्यान, या प्रकरणात संशयितांचे आर्थिक वाद, तसेच इतर कारणांतून वैमनस्य होते असे समोर आले आहे.कारण,संशयित विजय आहेर व मृत प्रशांतचे नेहमीच चुलक भावाची रिक्षा व आर्थिक वादातून खटके उडत होते. त्यातून दोघांनी एकमेकांना संपवून टाकण्याची भाषा करत खुन्नस दिली होती. त्यामुळे विजयने इतर मित्रांकरवी प्रशांतचा काटा काढण्याचे ठरवून त्याला मद्य पाजण्याच्या बहाण्याने बोलावून घेत निर्घृण हत्या केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी,सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

हत्येनंतर चाैघेही साेबतच पळाले

हत्या केल्यावर रात्री १० वाजेनंतर संशयित पंचवटीत आले. त्यांनी संगनमत पैशांची काँन्ट्री काढून नाशिकराेड येथून रेल्वेने कल्याण गाठले. येथे काही काळ थांबून थेट पुण्याची गाडी पकडली. चाैघे रविवारी दिवसभरात कल्याणमार्गे पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात गेले. ते तिथेच असल्याची माहिती युनिट एकचे उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पाेलीस नाईक प्रशांत मरकड, अंमलदार विशाल चाराेस्कर यांना कळाली. त्यांनी, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना कळविल्यानंतर त्यांच्या सूचनेने पथक निगडीत पाेहाेचले. तेव्हा चाैघेही संशयित बसस्टँन्डजवळ बसून असल्याचे दिसले. त्याक्षणी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, चाैघेही निगडीतून पुण्यातील एका मित्राकडे आश्रय घेण्यासाठी निघण्याच्या तयारीत हाेते.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या