त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar
- Advertisement -
मंगळवारी सायंकाळी येथे जोरदार पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व जलाशय मोठ्या प्रमाणावर भरण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस 1,200 मि.मी. पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये झाला आहे. त्र्यंबकेश्वरचे आंबोली तसेच अहिल्या धरण भरले आहे. गौतमी गोदावरी जलाशयात मोठा साठा वाढल्याने पाणीटंचाई सुसह्य होणार आहे. पावसाच्या चांगल्या हजेरीनंतर सर्वत्र भात आवण्या वेगात सुरू झाल्या आहेत.