Saturday, May 18, 2024
Homeजळगाववादळी पावसाने शेकडो पक्षी मृत्यूमुखी

वादळी पावसाने शेकडो पक्षी मृत्यूमुखी

वरणगाव फॅक्टरी, (Varangaon) ता. भुसावळ (वार्ताहर) –

शुक्रवारी रात्री जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील वरणगांव आयुध निर्माणी वसाहतीमध्ये शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले आहेत तर काही पक्षांना वाचविण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे.

- Advertisement -

वादळी पावसाचा व गारपीटीचा तडाका वरणगाव फॅक्टरीला अधिक बसला असुन परिणाम पशु पक्षी, प्राणी मात्रांवर झाला असुन काही ठिकाणी झाडांवरुन पक्षी खाली पडून मृत्युमुखी पडले तर काही पक्षांना वाचवण्यात प्राणी मित्र टीमला यश मिळाले आहे. टीमच्या सदस्यांनी भर पावसात व अंधारात, वादळवारा सुरु असतांन टॉर्चच्या सहाय्याने हे मदतकार्य केले. यात घटनेत काही पोपट झाडावरून खाली पडले अशी माहिती मिळताच त्या क्षणी घटनास्थळी पोहचून काही पोपटांना वाचवण्यात यश आले आहे तर काही पक्षांचा मृत्यु झाला आहे .
रुईखेडा विभागाचे वनपाल दिपश्री जाधव, वनपाल वानखेडे, चिंचोले, श्री. खंडारे यांनी जिवंत पक्षांना अधिवासात सोडण्यासाठी मार्गदर्शन केले. या स्तुत उपक्रमात सर्पमित्र, प्राणी मित्र कैलास ठाकूर, निशांत रामटेके, स्वप्नील सुरवाडे, अक्षय तेली, लखन लोहारे, भूषण कोळी, मनीष कोळी, सागर कोळी, राहूल कोळी, प्रतीक मेढे, हर्षल कोळी, धीरज सुरवाडे, आकाश सोनार, अनीकेत वानखेडे, कुणाल गुरचळ, लखन रनशिंगे, ओम शिंदे, राहूल खरात, मनोज अंबोडे व ग्रामपंचायत सदस्य बोधीसत्व अहिरे, बापू शिंदे, योगेश बोरोले आदींनी सहभाग घेतला.

झाडे पडल्याने मुख्य रस्ते बंद, विजपुरवठा खंडीत वादळी वार्‍याचा व गारपिटीचा वेग एवढा होता की, डी. एस. सी. लाईन जवळ तसेच पोस्ट ऑफिस रोडवर मोठे झाडे कोलमडून पडले होती. तसेच सदरची झाडे वीज वाहक तारेवर व खांबावरच पडल्याने इस्टेट मधील वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी फॅक्टरीतील विद्युत विभागातील कर्मचारी, पी. आर. रायपूरे, जयंत कोलते, अधिकारी श्री. सोनार, मुकेश बर्‍हाटे, श्री. जैन यांनी अथक प्रयत्नाने रात्रीच वीज पुरवठा सुरू केला. तसेच सकाळी इस्टेट व एम. टी. विभागातील कर्मचार्‍यांनी सकाळी झाडे बाजूला करून रस्ता सुरळीत केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या