Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकात्रजमधील परिस्थितीला महानगरपालिका जबाबदार - सुप्रिया सुळे

कात्रजमधील परिस्थितीला महानगरपालिका जबाबदार – सुप्रिया सुळे

पुणे (प्रतिनिधि) –

पुण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे. तर कात्रज

- Advertisement -

येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. कात्रज परिसराला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. कात्रजमधील परिस्थितीला भाजप सत्तेत असलेली पुणे महानगरपालिका जबाबदार आहे, असे थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी काल पुण्यात झालेल्या पावसाचा तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांची काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली. तसेच कात्रज येथील प्राणी संग्राहालयातही केली पाहणी. कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

बुधवारी रात्रीपासून पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शहरातील अनेक रहिवासी भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन आता राजकारण सुरु झालं असून बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. दोन वर्षापुर्वी कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळली होती. त्यावर कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आजच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाला भाजप जबाबदार असून आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून उद्या मार्गदर्शन घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या