अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसलेल्या शेतकर्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. शनिवारी रात्री व रविवारी सकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यातील आणखी 852 गावातील 3 लाख 87 हजार 523 शेतकर्यांची 2 लाख 67 हजार 83 हेक्टरवरील पिकांना पावसाचा दणका बसला आहे. कृषी विभागाच्या रविवारी केल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान संगमनेर, अकोले आणि कोपरगाव तालुके वगळता उर्वरित 11 तालुके वगळता 958 गावातील 3 लाख 56 हजार शेतकर्यांना परतीचा पावसाचा फटका बसला होता. त्यात 2 लाख 53 हजार शेतकर्यांची पिके बाधित झाली होती. नुकसानीचा हा आकडा रविवार (दि.21) पर्यंत होता. त्यात रविवार (दि. 27) रोजी पुन्हा वाढ झाली आहे. जिल्ह्यात नगर तालुक्यातील 117 गावातील 33 हजार शेतकर्यांची 21 हजार 898 हेक्टरवरील पिकांचे, पारनेर तालुक्यातील 131 गावातील 48 हजार 287 शेतकर्यांचे 35 हजार 448 हेक्टरवर, कर्जत तालुक्यातील 42 गावातील 22 हजार शेतकर्यांचे 398 शेतकर्यांचे, श्रीगोंदा तालुक्यातील 105 गावातील 62 हजार 33 शेतकर्यांचे 35 हजार 335 हेक्टरवर, श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावातील 23 हजार 564 शेतकर्यांचे 15 हजार 616 हेक्टरवर, राहुरी तालुक्यातील 96 गावातील 50 हजार 167 शेतकर्यांचे 44 हजार 567 हेक्टरवर, नेवासा तालुक्यातील 127 गावातील 32 हजार 780 शेतकर्यांचे 18 हजार 819 हेक्टरवर, संगमनेर तालुक्यातील 39 गावातील 11 हजार 596 शेतकर्यांचे 9 हजार 317 हेक्टरवर, कोपरगाव तालुक्यातील 79 गावातील 45 हजार 762 शेतकर्यांचे 33 हजार हेक्टरवर आणि राहाता तालुक्यातील 61 गावातील 57 हजार 833 शेतकर्यांचे 38 हजार 556 हेक्टरवरील पिकाचे 33 टक्के पेक्षा कमी अथवा 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.




