नाशिक | Nashik
गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस (Rain) हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात (Nashik City) विजांच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव
नाशिक शहरात पावसाने दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : नाशिकच्या विमानसेवेची भरारी; गत वर्षात अडीच लाख प्रवाशांनी घेतला लाभ
दरम्यान, पावसाने शहरातील सिडको, सातपूर, सीबीएस, शालीमार या परिसरासह आदी भागांत हजेरी लावली. तसेच पावसासोबतच जोरदार वारे असल्याने काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडल्याची घटना घडली. तर नवीन नाशिक (New Nashik) भागातील काही रस्त्यांवर पहिल्याच पावसात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा