Saturday, July 27, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्यातील १० गावांना अतिवृष्टीचा तडाखा

शेवगाव तालुक्यातील १० गावांना अतिवृष्टीचा तडाखा

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी )

तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागातील पाणलोट क्षेत्रात व डोंगर रांगामाध्ये रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणा-या प्रमुख नदयांना पुर आला व होत्याचे नव्हते झाले. नागरिकांच्या दुःखाला पारावर राहिला नाही.

- Advertisement -

या आलेल्या पुरामुळे संसारोपयोगी साहित्य, घराची पडझड, मृत नागरीक व जनावरे, वाहुन गेलेली जनावरांची संख्या, पिकांचे झालेले नुकसान बाधीत क्षेत्र आदींची तालुका प्रशासनांनी नेमलेल्या पथकांनी चार दिवस समक्ष पाहणी व पंचनामे करुन आकडेवाडी संकलित केली आहे.

तालुक्यासह पाथर्डी तालुक्यात रविवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने सोमवार दि.३० रोजी पहाटेच्या वेळेस नंदिनी, चांदणी, वटफळी या नदयांना पुर आला. पुराचे पाण्याने अनेक घरांची पडझड झाली. जनावरे, पिके, संसारोपयोगी साहित्य वाहुन गेले. वीजेचे अनेक खांब कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. मंदीरे, दुकाने, शाळा पाण्याखाली जाऊन प्रचंड नुकसान झाले. किंमती दुभती जनावरे वाहुन किंवा मृत पावल्याने कुटूंबाचा आर्थिक आधार ऊन्मळून पडला. दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे.

पुर परिस्थिती निवळल्यानंतर तहसिलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र २६ पथके तयार करुन डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा, खरडगाव, वरुर बुद्रुक व खुर्द, भगुर, जोहरापूर, वडुले बुद्रुक, शेवगाव येथील लांडे वस्ती, कराड वस्ती व ठाकुर पिपंळगाव या पुरग्रस्त दहा गावात मंगळवार दि .३१ पासून समक्ष पाहणी करुन पंचनामे करण्यास सुरुवात केली.

शुक्रवार दि. ३ रोजी या सर्व दहा गावांचे पंचनामे पूर्ण करुन तहसिलदार पागिरे यांच्याकडे सादर केली. घरात पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तुंचे झालेले नुकसान ९११, घरांची पडझड -११, मृत व्यक्तींची संख्या – १, मृत जनावरांची संख्या -१६८, वाहुन गेलेल्या जनावरांची संख्या -१९८२, पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांची संख्या-३००९, बाधित क्षेत्र २७०९.८३ हेक्टर . आता हा अहवाल प्रशासनास सादर केल्यानंतर पुरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार आहे. मदत मिळेल. ती किती व केव्हा मिळेल हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र आजचे काय ? हा प्रश्न काही कुटूंबासमोर उभा राहिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या