Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik Rain News : खडक माळेगावला पावसाची हजेरी

Nashik Rain News : खडक माळेगावला पावसाची हजेरी

खडक माळेगाव | वार्ताहर | Khadak Malegaon

- Advertisement -

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) खडक माळेगाव व परिसरात (Khadak Malegaon and Area) आज रविवार (दि.१८) रोजी दुपारच्या सुमारास तीव्र मेघ गर्जनेसह पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगल प्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल; २० समाजकंटक अटकेत

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने रणरणत्या उन्हात खरीपाच्या पिकांनी (Crop) माना टाकल्या होत्या. दरम्यान या परिसरात आज एक तास पावसाने हजेरी लावल्याने मका, सोयाबीन, मुग, भुईमुग यासह आदी भाजीपाला व शेतपिकांना जीवदान मिळाले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पावसाने आज खडक माळेगावसह खानगाव, सारोळे, वनसगाव, ब्राम्हणगाव, रानवड, टाकळी, कोटमगाव आदी ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. सकाळी देखील पावसाने अल्पकाळ तुरळक ठिकाणी हजेरी लावली होती. त्यानंतर दुपारी अचानक मेघगर्जनेसह सुरु झालेल्या पावसामुळे लोकांची (People) एकच धावपळ उडाली.

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त

दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून अद्याप या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला नाही. त्यामुळे
विहिरींची (Wells) जलपातळी देखील वाढली नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यातच आज जरी काही प्रमाणावर या भागात पाऊस झाला असला तरी शेतकरी (Farmer) मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या